पिंपरखेड येथे संयुक्त महापुरुष जयंती महोत्सव संपन्न
पिंपरखेड : प्रतिनिधी (दि.०८)
पिंपरखेड (ता.शिरूर) येथे रविवार (दि.०७) रोजी महापुरुषांचा संयुक्त जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला. गावातील सर्वधर्मीय बांधवांकडून एकत्रितपणे या कार्यक्रमाचे प्रथमवर्षी नियोजन करण्यात आले होते. प्रसंगी अध्यक्षस्थानी सोसायटीचे अध्यक्ष किरण ढोमे उपस्थित होते. या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त सकाळच्या सत्रात बुद्धवंदना, ध्वजारोहण, सूत्रपठण, धम्मपूजा, दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन, विविध भीमगीते आदि कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी विद्युत रोषणाई करत सायंकाळी गावामधून महापुरुषांच्या प्रतिमांची भव्य सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमप्रसंगी प्राध्यापक ज्ञानेश्वर कवाद यांचे व्याख्यान संपन्न झाले. यावेळी आपल्या मनोगतातून वक्त्यांकडून महापुरुषांच्या कार्याला उजाळा देण्यात आला.
या कार्यक्रमासाठी माजी उपसभापती बाळशिराम ढोमे, उपसरपंच विकास वरे, बाबुराव राक्षे, संदिप खळे, रामदास राऊत, माऊली ढोमे, इस्माईल पठाण, पोलीस पाटील सर्जेराव बोऱ्हाडे, बळवंत बोंबे, जयवंत बोंबे, म्हतारबा गायकवाड, सखाराम डिंगरे, बबनराव बोंबे, देवराम ढोमे, बाळू राक्षे, दिगंबर सोनवणे, मच्छिंद्र ढोमे, भिकाजी राक्षे, अनिल गायकवाड, उपाध्यक्ष सचिन बोऱ्हाडे, रविंद्र राक्षे, खजिनदार विशाल डिंगरे, सागर बारवेकर, राहुल राक्षे, नवनाथ राक्षे, विजय पडवळ, गौरेश दरेकर, राहुल बोंबे, विराज डिंगरे, सर्जेराव उदागे, संजय उदागे, कमलेश गायकवाड, साहिल राक्षे आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी उपसरपंच नरेश ढोमे यांनी केले; तर सागर उदागे यांनी आभार मानले.