पिंपरखेड येथील श्रीदत्त विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा
पिंपरखेड : सत्यशोध वृत्तसेवा
पिंपरखेड ( ता.शिरूर ) येथे श्री दत्त माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात २००८- ०९ च्या बारावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यानी १४ वर्षांनी एकत्र येत पुन्हा एकदा लहानपणीच्या मित्र-मैत्रिणींसमवेत आनंद लुटत शालेय आठवणींना उजाळा देत स्नेह मेळवा संपन्न केला.
विद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डी.बी.सांबरे, प्राचार्य आर.के.मगर यांच्या हस्ते सरस्वतीचे पुजन करण्यात आले.यावेळी अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यालयातील जुन्या आठवणींना उजळला दिला. त्या वेळचे शिक्षक, शिस्त, स्वच्छता, शिक्षकांनी दिलेली शिक्षा विद्यार्थ्यांनी केलेल्या खोडी इत्यादी गोष्टींचा आवर्जून उल्लेख करण्यात आला.आपण या शिक्षकांमुळे व या शाळेमुळेच घडलो असे विनम्रपणे नमूद केले.
शाळेच्या रंगरंगोटी साठी या माजी विद्यार्थ्यांकडून ५० हजार रुपये आर्थिक मदत करण्यात येणार असल्याचे यावेळी माजी विद्यार्थी नवनाथ लोंढे यांनी जाहीर केले. यावेळी निवृत्त प्राचार्य डी.बी.सांबारे,प्रा.आर.के.मगर, प्रा.एफ.एन.पंचरास,ग्राम विकास संस्थेचे खजिनदार शिवाजी बोंबे,माजी विद्यार्थी संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर शेळके यांनी मार्गदर्शन व सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रा.एस.डी.चौधरी, प्रा. एच.एन. तुपेरे , प्रा.शैलजा जाधव,माजी विद्यार्थी संस्थेचे उपाध्यक्ष तानाजी पोखरकर, सचिव आबाजी पोखरकर,प्रियांका भोसले,प्रियांका येवले प्रा.एस.आर.चव्हाण, प्रा.आय.बी., भोर, प्रा.के.डी.कोल्हे आदी उपस्थित होते.
माजी विद्यार्थी नवनाथ लोंढे,शाकुंतला बोंबे यांनी स्नेहमेळाव्याचे नियोजन केले. कार्यक्रम सुत्रसंचालन प्रा. यशवंत दाभाडे व आभार योगेश जोरी यांनी मानले.