टाकळी हाजी येथे वाचन दिन उत्साहात साजरा…
टाकळी हाजी
टाकळी हाजी तालुका शिरूर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती, वाचन दिन, तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान असे कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले.
कृष्णा तुकाराम घोडे या चौथीच्या वर्गातील विद्यार्थ्याने डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची भूमिका साकारत ग्रामस्थांना पेपर चे वितरण केले. आणि त्याच्या भाषणातून वाचनाचे महत्व तसेच कलाम यांनी पेपर चे वितरण करता करता घेतलेले शिक्षण , यातून आजच्या विद्यार्थ्यांनी कसा बोध घेतला पाहिजे याविषयी मत मांडले.
यावेळी बोलताना शाळेच्या मुख्याध्यापिका आशा खोमणे यांनी डॉक्टर कलाम यांच्या कार्याची महती विशद करून आपण वाचन केले तरच वाचू शकतो असे सांगताना विद्यार्थ्यांची वाचाना प्रती असलेली आवड याबद्दल विशेष कौतुक केले. प्रभाकर गावडे यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान केला.
शाळेच्या परिसरातील स्वचछता आणि विद्यार्थ्यांचा उत्साह ही बाब विशेष उल्लेखनीय होती.यावेळी निवृत्त सी ई ओ प्रभाकर गावडे,ग्रामपंचायत सदस्य अशोक गावडे,सामाजिक कार्यकर्ते अंकुश शितोळे, दत्ता उचाळे, पुढारीचे वितरक महादेव लामखडे,किशोर भालेकर, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका आशा खोमणे,सहशिक्षक मंगल गावडे,प्राजक्ता देशमुख,मच्छिंद्र देवकर उपस्थित होते.