निमगाव भोगी वि.का.सोसायटी तज्ञ संचालक पदी खरमाळे आणि रासकर
टाकळी हाजी : प्रतिनिधी ( दि.३)
निमगाव भोगी (ता.शिरूर) वि.का.सोसायटी च्या तज्ञ संचालक पदी कांतीलाल खरमाळे आणि धर्मराज रासकर यांची निवड झाली. या निवडीबद्दल सरपंच सुप्रिया संजय पावसे, माजी सरपंच संजय पावसे आणि ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी सरपंच सचिन सांबारे, सोसायटीचे अध्यक्ष नवनाथ शेवाळे, उपाध्यक्ष वंदना राऊत , अँड महेश रासकर,दिपक राऊत, फक्कड सांबारे, भाऊसाहेब जाधव, सुरेश फलके, किसन कोठावळे, गणेश कोठावळे, शिवाजी खरमाळे, सागर कळमकर, अमोल कोठावळे,विठ्ठल खरमाळे, अविनाश सांबारे, पिरभाऊ सांबारे,गणेश फलके, शांताराम राऊत आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
कांतीलाल खरमाळे आणि धर्मराज रासकर यांचे गावच्या विकासात मोलाचे योगदान असून त्यांचे सहकारातील अनुभव आणि मार्गदर्शन सोसायटीसाठी नक्कीच फायद्याचे राहील.
संजय हनुमंत पावसे माजी सरपंच निमगाव भोगी