शिरूर केसरी नवनाथ चोरे यांचा टाकळी ग्रामस्थांतर्फे सत्कार
टाकळी हाजी : वृत्तसेवा
टाकळी हाजी (ता.शिरूर) ग्रामस्थांच्या वतीने शिरूर केसरी नवनाथ बन्सी चोरे यास घरी जावून सन्मानित करण्यात आले. टाकळी हाजी चे आदर्श सरपंच दामुशेठ घोडे यांनी नवनाथ चोरे यांचा घरी जावून सत्कार केला.यावेळी पंचायत समिती सदस्य डॉक्टर सुभाष पोकळे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे,सोसायटीचे चेअरमन बन्सीशेठ घोडे,ग्रामपंचायत सदस्य अशोक गावडे,जयवंत मुसळे,मोहन चोरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
नवनाथ चोरे यांच्या कामगिरीमुळे कुस्तीच्या माध्यमातून गावचे नाव जिल्ह्यात झळकले असून भविष्यात जी संधी मिळेल तिचे सोने करण्याची ताकद नवनाथ मध्ये असल्याचे यावेळी बोलताना आदर्श सरपंच दामुशेठ घोडे यांनी सांगितले.