सावता परिषदेचे नगर येथे ५ वे त्रैवार्षिक अधिवेशन

मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे समाजबांधवांना आवाहन

0

टाकळी हाजी : ( साहेबराव लोखंडे)

सावता परिषदेचे ५ वे त्रैवार्षिक अधिवेशन शनिवारी (दि. ४ मार्च) नंदनवन लॉन्स अहमदनगर येथे होणार आहे. या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू असून यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण काका आखाडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि नगर शहराचे प्रथम महापौर भगवानराव फुलसौंदर, प्रथम नगराध्यक्ष नामदेव देवा राऊत ,धनश्री डेव्हलपर्स चे अध्यक्ष शंकरराव बोरकर , माजी जि.प. उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार , माजी नगराध्यक्ष भास्करराव आंबेकर, ए.डी.सी.सी. बँकेचे संचालक करणजी ससाणे या मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. सावता परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मयुर वैद्य यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले असून या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील जिल्हा अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांसह समाजातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत.

निमंत्रण समिती पुढीलप्रमाणे –
महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी – प्रधान महासचिव गणेश दळवी, उपाध्यक्ष महादेव ताटे, प्रविण गाडेकर, भास्कर गाढवे, पांडुरंग कोठाळे, साधना राऊत, मुख्य संघटक- संतोष राजगुरू, संघटक- बापुराव धोंडे, बाळासाहेब ढगे, शिवाजी येवारे, श्रीकांत महाराज माळी, संजय खैरनार, साहेबराव जाधव , प्रदेश सचिव विजय शेंडे, गारद माने प्रदेश प्रवक्ते – प्रा. डॉ. राजीव काळे, सहप्रवक्ते- प्रा. नाना आमले, खजिनदार पारस परमार, सोशल मिडीया प्रमुख विनीत गोरे, प्रदेशाध्यक्ष युवा आघाडी अॅड. गोपाळ बुरबुरे, प्रदेशाध्यक्ष महिला आघाडी – मनिषा सोनमाळी, मराठवाडा विभाग अध्यक्ष इंजि, शिवानंद झोरे, संपर्क प्रमुख विष्णुपंत खेत्रे, महासचिव विष्णुपंत काळे , उपाध्यक्ष पंडित रासवे, विष्णुपंत पुंड, बापुसाहेब शिंदे , संघटक शारदा कोथिंबीरे, संदीप अस्वर , मुंबई विभाग अध्यक्ष संतोष मोहळकर , संपर्क प्रमुख अशोक माने, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष राहुल जावळे आणि पदाधिकारी

      समाज बांधवांसाठी आवाहन

या कार्यक्रमास समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सावता परिषदेचे प्रदेश महासचिव गणेश दळवी यांनी केले आहे.”

Leave A Reply

Your email address will not be published.