रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशिय सामाजिक संस्थेच्या वतीने मराठी भाषा दिन साजरा
टाकळी हाजी : वृत्तसेवा
रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशिय सामाजिक संस्थेच्या वतीने सोमवारी ( २७ फेब्रुवारी) निबंध लेखन व मार्गदर्शन आयोजित करून जागतिक मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला.
शिरूर ग्रामीण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी मांजरे मॅडम,शरद पवार,रमेश चव्हाण, यशवंत कर्डिले यांनी मनोगत व्यक्त केले.विभाताई देव यांनी मुलांना मराठी भाषेविषयी अभिमान आणि मराठी भाषेची समृद्धी याविषयी मार्गदर्शन केले.
उपस्थित मान्यवरांचे हस्ते निबंध लेखन स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.यावेळी शिरूर ग्रामीणचे मा. आदर्श सरपंच नामदेव तात्या जाधव, मा.उपसरपंच यशवंत कर्डिले,रमेश चव्हाण,सामाजिक कार्यकर्ते शरद पवार, पत्रकार तेजस फडके,किरण पिंगळे ,आदिशक्ती महिला मंडळ अध्यक्षा शशिकला काळे, डॉ. वैशाली साखरे, वैशाली बांगर, प्रिया बिरादार, सुजाता पाटील, मनीषा साठे, इसवे ताई, शिक्षक वृंद आदी उपस्थित होते.
वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्यामुळे मुलांच्या विकासाला चालना मिळते .प्रत्येक शाळेत असे उप्रकम घेणे गरजेचे आहे. असे मत रामलिंग महिला उन्नती बहु.सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा – राणी कर्डिले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राणी कर्डिले तर आभार गणेश रासकर सर यांनी मानले.