सावता परिषद शिरूर तालुका उपाध्यक्षपदी इंदर खामकर
टाकळी हाजी : वृत्तसेवा
माळी समाजाच्या प्रश्नांसाठी आवाज उठवून न्याय देण्याचे तसेच विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाज संघटन करून प्रबोधनाचे कार्य करत असलेल्या सावता परिषदेच्या शिरूर तालुका उपाध्यक्ष पदी टाकळी हाजी (ता.शिरूर) येथील इंदर चंद्रकांत खामकर यांची निवड करण्यात आली.
सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण काका आखाडे , प्रदेश महासचिव गणेश दळवी आणि पुणे जिल्हा अध्यक्ष गोरखनाना भुजबळ यांनी नेतृत्व आणि समाजसेवेची आवड पाहून खामकर यांची निवड जाहीर केली.
नुकतेच त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी प्रदेश महासचिव गणेश दळवी , नगर जिल्हा सरचिटणीस गुलाब तात्या गायकवाड , पारनेर तालुका अध्यक्ष पृथ्वी कोल्हे , सावता परिषदेचे पदाधिकारी तसेच ग्रामपंचायत सदस्य अर्जुन खामकर, भरत खामकर , सामाजिक कार्यकर्ते अमोल रसाळ ,निलेश रसाळ, संकेत रसाळ, अश्विन रसाळ आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडीबद्दल इंदर खामकर यांचे सर्वच स्तरातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे.
पदाला न्याय देणार…
समाजसेवेचे व्रत अखंड जोपासत पदाला न्याय देण्याची भूमिका राहील.
— इंदर खामकर उपाध्यक्ष, शिरूर तालुका सावता परिषद