टाकळी हाजी येथे बैलाचा दशक्रिया विधी
टाकळी हाजी : प्रतिनिधी
टाकळी हाजी येथील साबळेवाडीतील पोपट कोंडीबा साबळे यांच्या राजा या बैलाचा दशक्रिया विधी सोमवारी (दि.१३) संपन्न झाला.
साबळे यांच्या घरच्या गायी कडून जन्म झालेल्या गोऱ्हयाने शर्यतीमध्ये भाग घेवून अनेक घाट गाजविले आहेत. चोवीस वर्षे वयाच्या घरातील एक सदस्याचे ( राजा बैलाचे) दहा दिवसांपूर्वी निधन झाल्याने त्यांनी हिंदू धर्म परंपरेने मनुष्याच्या विधिप्रमाने दशक्रिया विधी संपन्न केला. घाटाचा राजा हा किताब या बैलामुळे साबळे यांच्या बैलगाड्यास अनेकदा मिळाला आहे.
पाळीव प्राण्यांविषयची आस्था जोपासत आजही शेतकरी प्राणीमात्रांवर जीवापाड प्रेम करत आहेत. यांत्रिक युगात जरी शेती सुधारित पद्धतीने केली जात असली तरी बैलगाडा शर्यती सुरू झाल्याने शर्यतीचे बैल म्हणजे शेतकऱ्यांची मोठी संपत्ती मानली जात आहे.
यावेळी टाकळी हाजी चे माजी सरपंच दामुशेठ घोडे, बैलगाडा विमा कंपनीचे शिरूर आंबेगाव चे उपाध्यक्ष बन्सीशेठ घोडे,माजी उपसरपंच सखाराम खामकर, सामाजिक कार्यकर्ते अंकुश उचाळे, अंकुश शितोळे, सोसायटीचे माजी उपाध्यक्ष अशोक मेचे,बैलगाडा मालक आणि शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.