एक पाऊल स्वछतेकडे… गाव कचरामुक्त बनविण्यासाठी ग्रामपंचायत कडून घर तेथे कचराकुंडीचे मोफत वाटप

शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी ग्रामपंचायत चा उपक्रम

0

 

टाकळी हाजी : सत्यशोध वृत्तसेवा

टाकळी हाजी (ता. शिरूर) ग्रामपंचायती मार्फत गावठाणातील प्रत्येक घर,सरकारी कार्यालये आणि दुकाने या ठिकाणी कचराकुंडी (डस्टबीन) चे घरपोच वाटप करून एक पाऊल स्वच्छतेकडे उपक्रम राबविण्यात येत आहे.

पंधराव्या वित्त आयोगातून घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन या बाबी मधून कचरा मुक्त आणि स्वच्छ व सुंदर गाव बनविण्यासाठी नवनिर्वाचित ग्रामपंचायत कार्यकारी मंडळ निवडीनंतर पहिल्याच झालेल्या सभेत याबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सुमारे दोन हजार डस्टबिन खरेदी केल्याचे ग्रामविकास अधिकारी राजेंद्र खराडे यांनी सांगितले.

नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाने त्यांच्या निवडीनंतर पहिल्याच दिवशी झाडू हातात घेऊन बस स्टँड परिसर स्वच्छ केला होता. ग्रामपंचायत कार्यकारी मंडळ व प्रशासन यांनी काही ग्रामस्थांसह निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच सातारा जिल्ह्यातील स्वच्छ व आदर्श गाव निढळ ग्रामपंचायतला भेट देऊन परिसराची आणि त्यांनी राबविलेल्या योजनांची माहिती घेवून एक वेगळा उपक्रम राबविण्यात आला.

गावच्या परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्यामुळे गावास जोडणाऱ्या प्रत्येक प्रमुख रस्त्यांवर आणि गावातील चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू आहे , अशी माहिती माजी सरपंच दामूशेठ घोडे यांनी दिली.

यापूर्वी टाकळी हाजी ग्रामपंचायतचे सरपंच तसेच शिरूर पंचायत समितीचे सदस्य आणि या वेळी पुन्हा सरपंच असा राजकीय अनुभव असल्यामुळे या अनुभवाच्या जोरावर गावच्या विकासासाठी माजी गृहमंत्री व शिरूर आंबेगाव चे लोकप्रतिनिधी आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावच्या वैभवात भर घालण्यासाठी ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांसाठी बगीचा, क्रीडांगण तसेच ठीक ठिकाणी टॉयलेट आणि हँडवॉश स्टेशन उभारणी करण्याचा मनोदय आहे . .. सरपंच अरुणाताई दामूशेठ घोडे .

Leave A Reply

Your email address will not be published.