टाकळी हाजी : वृत्तसेवा ( दि.१२)
मीना शाखा कालव्यास रब्बी हंगामाचे प्रथम आवर्तन १० जानेवारी पासून सुरू असून कालव्याच्या टेल विभागात पाणी पोहोचले आहे. या पाण्याचा कांदा ,भाजीपाला ,ऊस, फळबागा ,मका ,कडवळ या पिकांना फायदा होणार आहे. खराब हवामान आणि अवकाळी पावसामुळे कांदा लागवड उशिरा झाली असल्याने कांदा लागवडीसाठी या पाण्याचा फायदा होणार आहे.
मीना शाखा कालव्यावरील २३ पाणी वापर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर व उपविभागीय अधिकारी रवींद्र हांडे व शाखाधिकारी सुनील दाते यांची भेट घेवून रब्बी हंगामाच्या आवर्तनासाठी मागणी केली होती. यासाठी सर्व शेतकरी,सभासद,पाटबंधारे विभाग कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
रोहिदास मुसळे,महादू मुसळे,सुभाष मुसळे,एकनाथ मुसळे,सुरेश चाटे,किरण मुसळे,बन्सी खाडे, रामा येडे,सुरेश चाटे ,दत्ता चाटे, पंढरी नाथ चाटे या शेतकऱ्यांनी पाणी टेल पर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष मदत केली.
रब्बी हंगामात दोन आवर्तने देण्यात येणार असून , पहिले आवर्तन जानेवारी महिन्यात आणि दुसरे आवर्तन १५ फेब्रुवारीला सोडण्यात येणार आहे. अशी माहिती पाणी वापर संस्था अध्यक्ष प्रकाश वायसे यांनी दिली.