कल्पना निचित यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

पारस काव्य कला जनजागृती संस्थेकडून सन्मानित

0

पिंपरखेड : प्रतिनिधी

पारस काव्य कला जनजागृती संस्थेकडून देण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दाभाडे मळा ( पिंपरखेड ) येथील शिक्षिका कल्पना निचित यांना नुकताच प्रदान करण्यात आला.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता भवन सानपाडा येथे या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.शिष्यवृत्ती परिक्षा,मंथन, कला,क्रिडा या शैक्षणिक उपक्रमात मुलांना प्रोत्साहन व मार्गदर्शनाद्वारे उल्लेखनीय कार्याबद्दल कल्पना निचित यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन आदर्श शिक्षिका पुरस्काराने गौरविण्यात आले. लेखक कवी पुंडलिक म्हात्रे, महंत संजय बर्वे, प्रकाश झेंडे, संस्थापक अध्यक्ष मंगेश चांदिवडे आदी मान्यवरांच्या यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन कल्पना निचित यांचा आदर्श शिक्षिका पुरस्काराने गौरव करण्यात आला.

         पिंपरखेडचे सरपंच राजेंद्र दाभाडे, वडनेरच्या सरपंच शिल्पा निचित, उपसरपंच विक्रम निचित, साईक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नवनाथ निचित यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.