दामूआण्णा घोडे फायनल चे मानकरी

जांबुत येथे पार पडल्या भव्य बैलगाडा शर्यती

0

 

 

टाकळी हाजी: वृत्तसेवा

जांबुत ( ता. शिरूर ) येथे राजमाता जिजाऊ साहेब जयंती निमित्त पार पडलेल्या भव्य बैलगाडा शर्यतीमध्ये दामू अण्णा घोडे यांचा बैलगाडा फायनल चा मानकरी ठरला.

जांबूत येथे दोन दिवस बैलगाडा शर्यतीचा थरार रंगला होता. या शर्यतीत शिरूर,खेड,जुन्नर, आंबेगाव, पारनेर, श्रीगोंदा इत्यादी तालुक्यातील एकूण ४५० बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला.फायनलच्या शर्यतीत दामूआण्णा घोडे ( टाकळी हाजी ) यांच्या बैलगाड्याने ११.५४ सेंकदात घाटाचे अंतर पार करत प्रथम क्रमांक पटकावला.तसेच द्वितीय क्रमांक भाऊसाहेब भागाजी निघुट ( वडझिरे ) तृतीय क्रमांक म्हाळसाकांत बैलगाडा संघटना (धामणी ) आणि चतुर्थ क्रमांक अक्षय रोहिदास जोरी (जांबुत ) यांनी पटकावला.

सुरेश शिवाजी थोरात हा बैलगाडा फळीफोड तसेच म्हाळसाकांत बैलगाडा संघटना धामणी हा बैलगाडा ‘घाटाचा राजा ‘ठरला.प्रथम व द्वितीय तसेच फायनल व फळीफोडसाठी पात्र ठरलेल्या बैलगाडा मालकांना एकूण १ लाख २५ हजार रुपयांचे बक्षीस वाटप करण्यात आले.पंचायत समिती सदस्य डॉ.सुभाष पोकळे,पंचायत समिती सदस्य अरुणाताई घोडे, प्रभाकर गावडे, रामभाऊ गायकवाड,बन्सी घोडे,सोसायटी अध्यक्ष बाळासाहेब पठारे,सरपंच दत्तात्रय जोरी,बाळकृष्ण कड, माऊली जगताप, उमेश राऊत,बाळासाहेब फिरोदिया आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहूल जगताप यांनी शर्यती सुरळीतपणे पार पडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

Leave A Reply

Your email address will not be published.