शिष्यवृत्ती परिक्षेत ऋतिका गावशेते चे यश
पिंपरखेड : प्रतिनिधी
पिंपरखेड (ता. शिरूर ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची विद्यार्थीनी ऋतिका पंढरीनाथ गावशेते हिने राज्य पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षेत २४२ गुण मिळवत जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले.सुलोचना नाणेकर यांनी तिला मार्गदर्शन केले.केंद्रप्रमुख महादेव बाजारे यांच्या हस्ते तिचा सन्मान करण्यात आला.यावेळी मुख्याध्यापक पी.सी.बारहाते,प्रविण गायकवाड, सुभाष कोरडे, बाळू बांबळे,पोपट भालेराव, सुनिता फापाळे,मेघा रणसिंग,सुरेखा घोडे आदी उपस्थित होते.