टाकळी हाजी : प्रतिनिधी (दि. ७)
राज्यात शिष्यवृत्तीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा शाळेने बावन्न वर्षाची शिष्यवृत्तीची यशाची परंपरा याही वर्षी कायम राखत नेत्रदीपक असे यश संपादित केले. पिंपळे खालसा शाळेची १९७१वर्षापासून शिष्यवृत्तीची परंपरा आजही अखंडितपणे चालू आहे. आत्तापर्यंत पिंपळे खालसा शाळेचे पाचशेहून अधिक विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झालेले आहेत. काही दिवसांपूर्वी पिंपळे खालसा शाळेतील दोन विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालय या ठिकाणी इयत्ता सहावी साठी निवड झाली आहे. यावर्षी जाहीर झालेल्या निकालानुसार शाळेचे दोन विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीमध्ये तर तेवीस विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये चमकले आहेत.
गुणवत्ता यादीत झळकलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे
राज्य गुणवत्ता यादी
जान्हवी आण्णासाहेब धुमाळ २८६ गुण (राज्यात ६वी)
प्रिया नारायण चोपडी २८६ गुण (राज्यात ६वी)
जिल्हा गुणवत्ता यादी
संस्कार अविनाश गावडे २७६ गुण
ईश्वरी सचिन भोसले २७६ गुण
ज्ञानेश नागेश नवगिरे २७४ गुण
प्रसाद विशाल धुमाळ २७२ गुण
जागृती प्रदीप परभाणे २७० गुण
प्रज्वल राजेंद्र गावडे २६८ गुण
आर्यन विजय पवार २६६ गुण
वीरश्री ज्ञानेश्वर पलांडे २६२ गुण
ध्रुव श्रीकृष्ण देशमुख २६२ गुण
देवांगी विशाल पलांडे २६२ गुण
शिवम गणेश धुमाळ २५८ गुण
स्वराज गणेश धुमाळ २५८ गुण
राज अमीर धुमाळ २५६ गुण
कार्तिक संतोष भुमकर २५४ गुण
शुभदा संदीप धुमाळ २५२ गुण
स्नेहल उमेश नवगिरे २४८ गुण
यशराज सतीश पलांडे २४६ गुण
समर्थ रोहिदास धुमाळ २४४ गुण
हर्ष संदेश धुमाळ २४४ गुण
श्रावणी नवनाथ को-हाळे २४४ गुण
गौरी ज्ञानेश्वर पवार २४४गुण
विरेन निलेश धुमाळ २४२गुण
श्रावणी संजय गवळी २४० गुण
जवाहर नवोदय विद्यालय निवड – संस्कार अविनाश गावडे आणि ईश्वरी सचिन भोसले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सुशीला माकर-बोखारे व दिनेश निघोजकर, या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक शिक्षकांचे गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर , शिक्षण विस्तार अधिकारी वंदना शिंदे , केंद्रप्रमुख राजेंद्र टिळेकर , मुख्याध्यापिका ललिता धुमाळ तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य, ग्रामपंचायत पिंपळे खालसाचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य, विविध कार्यकारी सोसायटी चे चेअरमन व्हाईस चेअरमन व सर्व सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष ,सर्व पालक वर्ग व पिंपळे खालसा ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.