निमगाव भोगी च्या सरपंच पदी सुप्रिया पावसे
निमगाव भोगी च्या सरपंच पदी सुप्रिया पावसे
टाकळी हाजी : वृत्तसेवा
निमगाव भोगी ( ता.शिरुर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुप्रिया संजय पावसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आधीचे सरपंच यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी ग्रामपंचायत सभागृहात सर्व ग्रामपंचायत सदस्यांची बैठक झाली. त्यावेळी पावसे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी माधुरी बागडे यांनी जाहिर केले.
यावेळी माजी सरपंच उत्तम व्यवहारे, संजय हनुमंत पावसे, रामदास सांबारे,अंकुश इचके, सचिन सांबारे, उपसरपंच सिंधूबाई रासकर सोसायटीचे अध्यक्ष नवनाथ शेवाळे, उर्मिला फलके,विठ्ठल जाधव,रविंद्र पावसे, लक्ष्मण सांबारे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष काळुराम मलगुंडे, मनोहर व्यवहारे, नामदेव बढे,मेजर बाळासाहेब बढे, किसन कोठावळे, पोलीस पाटील रायचंद व्यवहारे,अप्पासाहेब आसवले, सुरेश फलके, फक्कड सांबारे, रामदास रासकर, सचिन रासकर, शिवाजी खरमाळे, कांतीलाल खरमाळे, रमेश पावसे, विठ्ठलशेठ पावसे,नशीब पावसे, रामदास पावसे, सागर पावसे, सतीश पावसे, गणेश कोठावळे, वालमिक पावसे, कैलास पावसे, किसन कोठावळे, नामदेवराव कोठावळे, प्रकाश इचके, मोहन जाधव, मा. अभियंता ज्ञानेश्वर बढे, विशाल फलके, वामनशेठ इचके, आकाश इचके, ग्रामसेविका गवळी कौशल्या, कामगार तलाठी जितेंद्र शेजूळ, पंचायत कर्मचारी अध्यक्ष शिरूर तालुका व वाल्मिक रासकर, बाळासाहेब राऊत, रामदास विष्णू रासकर, अक्षय जगताप आदी प्रमुख उपस्थित होते.
सुप्रिया पावसे यांची सरपंचपदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आंबेगाव शिरुर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, माजी जिल्हा परिषद सदस्या स्वातीताई पाचुंदकर व पंचायत समितीचे माजी सभापती विश्वासआबा कोहकडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे , मानसिंग पाचुंदकर पाटील आणि उच्चशिक्षित व गावच्या राजकारणाचा आणि समाजकारणाचा अभ्यास असलेले पती माजी सरपंच संजय हनुमंत पावसे यांच्या मार्गदर्शना खाली गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केला जाईल .असे नवनिर्वाचित सरपंच सुप्रिया पावसे यांनी सांगितले.