शांताई उद्योग समूहाची सावली हरपली…

दिलीप सोदक यांना मातृ शोक

0

टाकळी हाजी :  वृत्तसेवा

शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील शांताई उद्योग समूहाचे अध्यक्ष दिलीप सोदक यांच्या मातोश्री शांताबाई नाथू सोदक यांचे बुधवारी ( दि.४) रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी दुःखद निधन झाले.

मोठा मुलगा पोपट याचे एकोणीस वर्षापूर्वी आणि पतीचे अकरा वर्षापूर्वी निधन झाल्यानंतर कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारी खांद्यावर पेलवून शांताबाई यांनी पुणे जिल्ह्यातील एक नावाजलेला शांताई उद्योग समूह सक्षमपणे चालविण्यास मुलगा दिलीप व कुटुंबास मोलाची साथ दिली.

त्यांच्या पश्चात मुलगा दिलीप नाथू सोदक, तीन मुली सुषाबाई विठ्ठल कांदळकर, अलका सावकार घोडे, उषाबाई विठ्ठल कांदळकर ,दोन सूना यमुना पोपट सोदक,विमल दिलीप सोदक आणि नातवंडे राहुल पोपट सोदक, अंकुश पोपट सोदक , निलेश दिलीप सोदक, वर्षा विकास घोडे असा मोठा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.