हनुमान विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी
टाकळी हाजी : वृत्तसेवा
निमगाव भोगी (ता. शिरूर) येथील हनुमान माध्यमिक विद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.या कार्यकर्मामध्ये नवनिर्वाचित सरपंच सुप्रिया संजय पावसे यांचा मुख्याध्यापक शहाजी भोस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पावसे यांनी सरपंच निवडीनंतर पहिल्याच दिवशी सावित्रीबाई फुले यांची जयंती निमित्त पूजन करण्याची आणि बोलण्याची संधी मिळाली याबद्दल खुप आनंद होतोय असे मनोगत व्यक्त करीत सर्व महिलांनी जीवनात सावित्रीबाईचा आदर्श घेतला पाहिजे, असे मार्गदर्शन केले आणि नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी सरपंच संजय पावसे, ग्रामसेविका कौशल्या गवळी, वाल्मीक रासकर आणि शिक्षक बाजीराव टावरे, सदानंद खामकर, माने, गाजरे, कर्मचारी गोकुळ कारले, दिना बढे, लेखनिक विनायक नरवडे आणि विद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.