नवीन वर्षाचा पहिला रविवार ठरला घात वार

0

 

टाकळी हाजी वृत्तसेवा :

शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील उचाळे वस्ती येथील ज्ञानेश्वर ( माऊली) प्रभाकर उचाळे या ३२ वर्षीय युवकाचा रविवार दिनांक ( १) सायंकाळी उचाळेवस्ती रोडवर झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ज्ञानेश्वर हा सायंकाळच्या वेळी मोटरसायकल वर चाललेला असताना अज्ञात वाहनाने त्यास धडक दिली. या धडकेने रस्त्याच्या कडेने चालत असलेल्या एका व्यक्तीस मोटर सायकल आदळली व त्यामुळे त्या व्यक्तीचा पाय मोडला आहे. अपघातानंतर ज्ञानेश्वर व ती व्यक्ती (नाव समजू शकले नाही) दोघेही बेशुद्ध पडलेले होते.

संध्याकाळची वेळ असल्यामुळे रस्त्याने वाहतूक कमी होती. अज्ञात वाहनाने धडक दिल्यानंतर सदर वाहन चालक वाहन घेऊन पळून गेला आहे. बराच वेळ अपघाताची कल्पना कोणालाही न मिळाल्यामुळे दोघेही बेशुद्ध अवस्थेत पडून होते. ज्ञानेश्वर याच्या डोक्यास जबर मार लागल्याने त्याच्या डोक्याला सूज आली होती. रस्त्याने प्रवास करणारे एका व्यक्तीने रस्त्याच्या कडेला पडलेल्या ज्ञानेश्वर यास पाहिले परंतु डोक्याला सूज असल्यामुळे ओळख पटली नाही, त्याने इतरांना फोन करून कळविले. मोटर सायकल पाहिल्यानंतर तो ज्ञानेश्वर असल्याची खात्री झाली.

त्यास दवाखान्यात आणण्यात आले परंतु तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. दुसऱ्या व्यक्तीस सरकारी दवाखान्यात नेण्यात आले आहे.

नवीन वर्षाचा पहिला रविवार हा घात वार ठरला असून टाकळी हाजी गावावर शोककळा पसरली आहे.घटना समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.