तब्बल बावीस वर्षांनी पुन्हा भरला दहावीचा वर्ग
सविंदणे येथील १९९९-२००० श्री गुरुदेव दत्त विद्यालयाची १० वी ची बॅच
सविंदणे : वृत्तसेवा
सविंदणे ता. शिरूर येथील श्री गुरुदेव दत्त विद्यालयात शिक्षण घेतलेल्या १९९९ -२००० या इयत्ता १०वीच्या बॅचच्या विदयार्थ्यांनी सर्वच क्षेत्रात प्रगती करत मोठे नावलौकिक मिळवले असून वेगवेगळ्या क्षेत्रात नैपुण्य मिळवून विशेष उंची प्राप्त केली आहे.
१९९९-२००० बॅचच्या विद्यार्थ्यांचा तब्बल २२ वर्षांनी स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामुळे सर्वच विदयार्थी, शिक्षक बऱ्याच दिवसांनी एकमेकांना भेटल्यामुळे या भेटीचा आंनद सर्वांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. अनेक जणांनी आपल्या मनोगतातून आपल्या भावना व्यक्त केल्या.विद्यालयात एकत्र आलेल्या तत्कालीन शिक्षकांसह विद्यार्थांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
रोजच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढत शिक्षण घेतलेल्या विद्यालयाच्या माजी विद्याथ्र्याच्या आयोजनातून तब्बल २२ वर्षांनी पुनश्च भेटीचा योग जुळून आला. व्हॉट्सअॅप च्या माध्यमातून नंबर मिळवत ते एकमेकांना संपर्क करून एकत्र आले.
या बॅचचे वैशिष्ट म्हणजे या बॅचमधून उच्च शिक्षण घेत स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उपायुक्त ,वैद्यकिय अधिकारी,
प्रगतशील शेतकरी, वकील, इंजिनिअर, आदर्श पत्रकार , राजकारणी, व्यापारी, बँक मॅनेजर, कॉन्ट्रॅक्टर, तसेच देशसेवा करणारे आजी माजी सैनिक,खाजगी कंपनीत विविध प्रकारचे पदावर काम करणारे विद्यार्थी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, उत्तम गृहिणी, शिक्षिका, उद्योजक, शेअर्स मार्केटींग,फायनल सम्राट, हॉटेल, इलेक्ट्रिशियन, डेकोरेटर व्यावसायिक अशा समाजकारण ,राजकारण आणि कौंटुबिक जबाबदारी म्हणुन उत्कृष्ठ पालक घडलेली एक आगळी वेगळी बॅच म्हणुुन संबोधली जात आहे. विद्यार्थी व पालक , शिक्षकांचे तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचे अनुभव व त्यावेळीचे गमती जमती ऐकण्याची ची सुवर्ण संधी त्यामुळे मिळाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब भोर हे होते. यावेळी शिक्षक नप्ते सर, गोरे सर,गावडे सर, कळमकर सर, पोळ सर, मिसाळ मॅडम, दुसाने मॅडम, पुंडे सर, शिंदे सर, साकोरे सर दुसाने सर, महामुनी सर ,पवार मामा हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भिमा लंघे, राजश्री मोटे यांनी केले. आभार एडवोकेट अविनाश लंघे यांनी मानले.