पाऊस थांबला नाही तर डाळिंब शेतकऱ्यांचे मोडणार कंबरडे

डाळिंब उत्पादक शेतकरी चिंतेत

0

पाऊस थांबला नाही तर डाळिंब शेतकऱ्यांचे मोडणार कंबरडे

टाकळी हाजी

शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात डाळिंबाच्या बागा असून शेतकऱ्यांचा कल हा हस्त बहार धरण्याकडे असतो. दरवर्षी साधारणपणे पंधरा ऑगस्ट ते सप्टेंबर अखेर पर्यंत बागांची पानगळ केली जाते. मात्र यावर्षी पावसामुळे ऑक्टोबर महिना संपत आला तरी पाऊस थांबायला तयार नाही.डाळिंब शेतकऱ्यांनी बागेची पानगळ केली असून पावसाच्या रोजच्या हजेरीमुळे शेतकऱ्यांना कायमच बागेची फवारणी करावी लागत आहे.

टाकळी हाजी, माळवाडी, कवठे येमाई, मलठण,म्हसे या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात डाळिंबाच्या बागा असून शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी या गावाकडे डाळिंबाचे आगार म्हणून पाहिले जाते.

या महिना अखेर पर्यंत अशीच परिस्थती राहिली तर हा हंगाम धोक्यात येवू शकतो. व केलेला खर्च वाया जाणार या भीतीने शेतकरी पाऊस उघडण्याची वाट पाहत आहेत. दरवर्षी या काळात बागा फुलोऱ्यात आलेल्या असतात, परंतु चालू वर्षी पावसाच्या अवकृपेमुळे बागांची पानगळ सुध्धा व्यवस्थित झाली नाही.

अतिवृष्टीमुळे बागेत मर रोग, बुरशीजन्य रोग, सुरस्या, तेल्या आदी रोगांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी खर्च करून भवितव्याची चिंता करत असल्याने त्यांचे कंबरडे मोडले असल्याचे दिसून येत आहे.

डाळिंब फवारणी करताना केमिकल अंगावर उडते , पावसामुळे जास्त फवारण्या कराव्या लागत असल्याने त्वचेचे आजार ,श्वसनाचे व डोळ्यांचे विकार वाढत असून शेतकऱ्यांनी फवारणी करताना काळजी घ्यावी असे आवाहन डाळिंब मार्गदर्शक कैलास गावडे, सामाजिक कार्यकर्ते संतोष गावडे, डाळिंब उत्पादक योगेश हिलाळ यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.