टाकळी हाजी सिंचन शाखेमध्ये पाणी वापर संस्थाना प्रशिक्षण
टाकळी हाजी : वृत्तसेवा
मिना सिंचन शाखा टाकळी हाजी येथे जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन आणि आयटिसी मिशन सुनहरा कल व अफार्म संस्थेमार्फत शाखा अंतर्गत येणार्या आठ पाणी वापर संस्थाना बुधवारी (दि.२१) प्रशिक्षण देण्यात आले.
कुकडी पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अधिकारी आर जी हांडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच शाखाधिकारी एस टी दाते मिना शाखा कालवा पाणी वापर संस्थांचे अध्यक्ष प्रकाश वायसे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
या प्रशिक्षण दरम्यान उपस्थित शेतकर्यांना जलसंपदा विभाग व आयटिसी अफार्म मधील सहभागिता, उद्दिष्टे,आयटिसी व जलसंपदा विभाग यांचे कार्ये आणि जबाबदारी तसेच पाण्याचा कार्यक्षम वापर या संबंधी माहिती देण्यात आली.यामध्ये पाणी वापर संस्थाची भुमिका व फायदे – सभासदांचा सभामध्ये,देखभाल करण्यामध्ये तसेच प्रशिक्षणामध्ये सक्रिय सहभाग , शेती करिता पाण्याची मागणी तसेच पाण्याचा ताळेबंद तयार करणे , जलसंपदा विभागाला पाण्याची मागणी वेळेत करणे, पाण्याचे वाटप जलसिंचन प्रणालिची देखभाल व संचलन , पाणी पट्टी भरणे व वेळेत वसुली करणे, पाणी वापराच्या कार्यक्षम पध्दती व पिक पध्दतीची शिफारस करणे, स्थानिक वादांवर मार्ग काढणे शेतकर्यांच्या समुहासाठी एकञित कृती करणे , पाणी वापर संस्था चे सर्व कागदपञ आणि नोंद सांभाळणे. आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
पाणी वापर संस्थानी पाणी मागणी अर्ज करावा. यामध्ये सभासदांकडुन पाणी वापर संस्थेस पाणी वापर संस्था सभासदांना पाण्याचा मागणीचा फाॅर्म भरायला सांगते. पाणी वापर संस्थेने सदस्यांना फाॅर्म सादर करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे.सभासदांनी तो विहित फाॅर्म भरुन पाणी वापर संस्थेकडे द्यायला हवा.पाणी वापर संस्थेकडुन जलसंपदा विभागाला मिळालेल्या अर्जांचे प्रमाणीकरण ,एकुण क्षेञ आणि पाण्याची आवश्यकता याचा सारांश काढणे,जलसंपदा विभागाकडे विहित नमुन्यामध्ये हि मागणी सादर करणे इ.माहिती अफार्म,पुणे समुह संघटक अमितकुमार मेहञे यांनी दिली.
या कार्यक्रमाचे सुञसंचालन मनोहर मोहिते यांनी तर आभार अर्चना रसाळ यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संकेत तायडे व विक्रम पवार यांनी परिश्रम घेतले.