पिंपरखेड शाळेत विद्यार्थ्यांनी भरवलेल्या बाजारास ग्रामस्थांचा प्रतिसाद
टाकळी हाजी : दि.२० (वार्ताहर)
पिंपरखेड येथे जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांनी भरवलेला बाजाराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. बाजारात पंधरा हजार रुपयांची उलाढाल झाली असल्याचे मुख्याध्यापक पी.सी. बारहाते यांनी सांगितले.
जिल्हा परिषद शाळा पिंपरखेड या शाळेच्या एकशे चार व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी विद्यार्थ्यांनी चित्रे रेखाटन करत ,तसेच विज्ञान प्रदर्शन व रांगोळी चे आयोजित केले होते.विद्यार्थ्यांनी सुबक चित्रे काढून शिक्षकांची चित्र , वस्तूचित्रे काढत उपस्थित पालक व ग्रामस्थांची मने जिंकली.
विज्ञान उपकरणे यात रस्ते सुरक्षा,घास तोडणी मशीन,तोफ,सौर ऊर्जा , पवन ऊर्जा इत्यादी उपकरणे विद्यार्थ्यांनी बनवली होती.खाऊ गल्ली कार्यक्रमात ओली भेळ,इडली, वडा,लाडू,सरबत,घरगुती, पाककृती चा ग्रामस्थांनी आनंद घेतला .
विद्यार्थ्यांनी बाजार भरवून जी आर्थिक उलाढाल केली त्यामुळे दैनंदिन जीवनातील अनुभव घेवून व्यवहार ज्ञान आत्मसात केले असल्याचे प्रतिपादन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरण ढोमे यांनी केले.
यावेळी उपसरपंच विकास वरे ,अध्यक्ष किरण ढोमे, शरद बोंबे , लक्ष्मण गायकवाड,दिलीप बोंबे, प्रियांका बारवेकर, पत्रकार आबाजी पोखरकर, नवनाथ रणपिसे, व्यवस्थापन समितीचे सदस्य ,ग्रामस्थ तसेच मुख्याध्यापक पी.सी.बारहाते,प्रविण गायकवाड,सुभाष कोरडे,बाळू बांबळे,पोपट भालेराव, सुनिता फापाळे,मेघा रणासिंग,सुरेखा घोडे, सुलोचना नानेकर,या शिक्षकांनी नियोजन केले .