टाकळी हाजी : प्रतिनिधी
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत यांत्रिकीकरण – ट्रॅक्टर व ट्रॅक्टर चलित अवजारे, संरक्षित शेती, कांदाचाळ उभारणी, शेततळे अस्तरीकरण, पु. अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका आदी योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्वसाधारण तसेच अनुसूचित जाती व जमातीतील प्रवर्गातील लाभार्थ्यांचे अर्ज भरण्यासाठी १९ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत विविध वैयक्तिक लाभाच्या प्रमुख योजनांचा एकत्रितपणे महाडीबीटी या ऑनलाइन पोर्टलद्वारे लाभ घेण्यासाठी शेतकन्यांनी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर माहिती भरावी.असे कृषी सहायक सुधाकर ढाके यांनी सांगितले.
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांकरिता विशेष मोहीम राबविली जात आहे त्याकरिता कॅम्प घेतले जात आहेत. शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की महाडीबीटी या संकेतस्थळावर आपले अर्ज करावेत. तसेच कॅम्पमध्ये सहभागी होऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या योजनांकरिता अर्ज करून योजनांचा लाभ घ्यावा. – योगिता गडाख, मंडळ कृषी अधिकारी, शिरूर