न्यू इंग्लिश स्कूल पारनेरचे विद्यार्थी नवनिर्मितीत दंग
कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवडे यांनी विद्यार्थ्यांना दिले पर्यावरण पूरक आकाश कंदील बनवण्याचे प्रात्यक्षिक
पारनेर
पारनेर येथील न्यू इंग्लिश स्कूल या विद्यालयामध्ये दिपावली निमित्त विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्ती, नवनिर्मिती तसेच विविध कलागुणांना वाव मिळण्यासाठी ‘ आकाश कंदील बनवा ‘ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यशाळेमध्ये इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या २१० विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने सहभाग नोंदवला.
विद्यालयाचे कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवडे यांनी विद्यार्थ्यांना अतिशय सुलभ पद्धतीने दोन ते तीन वेगवेगळ्या प्रकारचे पर्यावरण पूरक आकाश कंदील कशा पद्धतीने बनवायचे याचे प्रत्यक्ष धडे दिले. विद्यार्थ्यांनीही विविध प्रकारच्या रंगीत कागदांचा उपयोग करत पर्यावरण पूरक आकाश कंदील तयार करण्याचा आनंद घेतला.
यानिमित्ताने सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना प्राचार्य बाळासाहेब करंजुले यांनी सांगितले शिक्षण ही निरंतर प्रक्रिया आहे.विद्यार्थ्यांना बौद्धिक शिक्षणाबरोबरच कौशल्यधिष्ठित शिक्षण ही सुद्धा काळाची गरज आहे त्यामुळे भविष्य काळामध्ये अशा पद्धतीचे कौशल्य जर आपण आत्मसात केले तर अशा विविध प्रकारच्या कला व्यवसायामध्ये विद्यार्थी उत्तम करिअर करू शकतो. तसेच विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेले पर्यावरण पूरक आकाश कंदीलच दिपावली सणाला वापरावेत असा संदेश दिला. उपप्राचार्य संजय कुसकर पर्यवेक्षक, अंकुश अवघडे यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
कार्यशाळा यशस्वीतेसाठी विद्यालयातील मनोहर रोकडे,निलेश पाचारणे,श्रीकांत शिंदे ,सुशांत पंदरकर,प्रमोद कोल्हे,सुरज घोडके,संदीप पांढरे ,सुरेखा थोरात , मंगल पठारे ,कल्पना नरसाळे, रिमा कांबळे आदि शिक्षकांचे सहकार्य लाभले.
या उपक्रमाबद्दल अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे,सचिव जी.डी.खानदेशे, विश्वस्त जयवंत वाघ, पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती राहुल झावरे, कलाशिक्षक संघाचे अध्यक्ष संजय पठाडे तसेच सर्व शिक्षक वृंद यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.