मंगेश थिगळे यांची पोलीस हवालदारपदी बढती..
टाकळी हाजी : प्रतिनिधी
पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखा येथे कार्यरत असलेले पोलीस नाईक मंगेश नारायण थिगळे यांची नुकतीच पोलीस नाईक पदावरुन पोलीस हवालदारपदी बढती झाली आहे.
पोलीस दलातील पोलिसांच्या सेवा कार्यकाळानुसार बढती झालेली असून पुणे ग्रामीण पोलीस दलातील अनेक जणांची पोलीस नाईक ते पोलीस हवालदार, पोलीस हवालदार पदाहून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती झालेली असताना स्थानिक गुन्हे शाखा विभागात कार्यरत असलेले मंगेश थिगळे यांची देखील बढती झाली असून त्यांनी यापूर्वी शिरुर , रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशन येथे काम केले आहे.
पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस दलात २००७ साली भरती झाल्यापासून शिरूर तसेच रांजणगाव एमआयडीसी येथे केलेल्या कामाची पावती म्हणून स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण या ठिकाणी काम करण्याची त्यांना संधी मिळाली.
स्थानिक गुन्हे शाखा ही पुणे ग्रामीण जिल्हयाची गुन्हे अन्वेषण विभागातील महत्त्वाची शाखा असून शिरूर, रांजणगाव पोलीस स्टेशन येथे दप्तरी कामकाजा बरोबर गुन्हे शोध पथकात त्यांनी काम केले. सर्व ठिकाणी सामाजिक,राजकीय स्तरात जनसंपर्क असून प्रत्येक वयोगटातील व्यक्तीमध्ये त्यांची ओळख आहे.
सध्या ते स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण येथे कार्यरत असून अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आणले आहेत. गुन्ह्यांचा य़ोग्य तपास करून छडा लावण्याचे काम ते शिताफीने करत आहेत.सविंदणे, कवठे येमाई, कारेगाव, सोने सांगवी,शिरूर येथील खुन,दरोडे, अपहरण त्याचबरोबर पिंपरखेड येथील बँक दरोडा यातील आरोपी पकडण्यात महत्वाची कामगिरी त्यांनी केली आहे. शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर, पिकअप,जनावरे, मोटार सायकल चोरी यासारखे गुन्ह्यातील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले त्यात थिगळे यांनी मोलाची कामगिरी बजावली.त्यांच्या कामाबद्दल अनेकदा मान्यवरांकडून त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
त्यांची नुकतीच सेवा कार्यकालानुसार पोलीस नाईक या पदातून पोलीस हवालदारपदी बढती झाली आहे, बढती बद्दल त्यांचे पुणे जिल्ह्यातून स्वागत होत आहे, तर स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांचे कडून थिगळे यांना सन्मानित करण्यात आले आहे.