कळमजाई फायटर्स संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी
जांबूत येथे क्रिकेट स्पर्धांचे बक्षीस वितरण संपन्न
पिंपरखेड प्रतिनिधी (दि.३)- प्रफुल्ल बोंबे
राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नुकत्याच पार पडलेल्या राजेंद्र गावडे युवामंच आयोजित जांबूत प्रिमिअर लीग स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शुक्रवार (दि.०२) रोजी संपन्न झाला. यामध्ये कळमजाई फायटर्स हा संघ गणराज इलेव्हन संघावर मात करत प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. या स्पर्धेत एकूण आठ संघांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी द्वितीय क्रमांक गणराज इलेव्हन, तृतीय क्रमांक आदर्श ग्रामविकास प्रतिष्ठान, तर चतुर्थ क्रमांक जय हनुमान कला क्रीडा संघाने मिळवला. प्रसंगी सर्व विजयी संघांचे अभिनंदन करण्यात आले.
जांबूत (ता.शिरूर) येथे (दि.२८ ) ते (दि. २ ) या काळात जांबूत प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी ग्रामीण भागातील तरुणांना क्रिकेट स्पर्धांसाठी भव्य क्रीडांगण उभे करण्यासाठी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी यावेळी सांगितले.
प्रसंगी युवा नेते राजेंद्र गावडे, माजी पंचायत समिती सदस्य वसुदेव जोरी, सरपंच दत्तात्रय जोरी, सतिश गोडसे, बाळासाहेब दरेकर, बाळकृष्ण कड, बाळासाहेब फिरोदिया, सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब पठारे, बाळासाहेब डांगे, बाळासाहेब बदर, नाथा जोरी, राहुल जगताप, भागीनाथ कोरडे, के.टी.जोरी यांचेसह परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी जालिंदर डुकरे, प्रवीण गाजरे, संतोष जोरी, योगेश जोरी,संदिप जोरी, योगेश पावडे आदींनी प्रयत्न केले. स्पर्धेचे समालोचन नवनाथ साबळे, चैतन्य गांजे , प्रशांत पानमंद यांनी तर सूत्रसंचालन लहू गाजरे यांनी केले.