पिंपरखेड येथे मोफत आरोग्य शिबीर
गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील आणि भीमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
पिंपरखेड प्रतिनिधी :
माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व माजी सभापती देवदत्त निकम यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरखेड येथील महिलांसाठी आळेफाटा येथील हॉस्पिटलमध्ये घेण्यात आलेल्या महिलांच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात २६ महिलांची तपासणी करण्यात आली.
पिंपरखेडचे सामाजिक कार्यकर्ते शरद रोहिदास बोंबे यांनी सी क्युअर कॅन्सर हॉस्पिटल आळेफाटा येथे महिलांचे मोफत वैद्यकीय तपासणी शिबीर आयोजित केले होते.डॉ.अमोल डुंबरे यांनी सर्व महिलांची वैद्यकीय तपासणी करून, महिलांच्या विविध आजाराबाबत वैद्यकीय सल्ला दिला.या शिबिरात पिंपरखेड गावातील २६ महिलांची आरोग्य तपासणी तसेच सोनोग्राफी, सी.टी स्कॅन करण्यात आले.शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष शरद बोंबे यांच्याकडून या सर्व महिलांना शिबिरात जाण्यासाठी बसची व्यवस्था तसेच जेवण देण्यात आले.
सभापती देवदत्त निकम यांच्या मार्गदर्शनाखाली या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील वैद्यकीय उपचारासाठी महिलांना योग्य मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शरद बोंबे यांनी सांगितले.