लेझिम स्पर्धेत खंडाळे शाळा तालुक्यात प्रथम
टाकळी हाजी : दिनांक २७ (वार्ताहर)
यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव अंतर्गत तालुकास्तरीय स्पर्धेत लेझिम मुली ( मोठा गट ) जिल्हा परिषद शाळा खंडाळे या शाळेने प्रथम क्रमांक मिळवला असून या स्पर्धा मंगलमूर्ती विद्याधाम प्रशाला रांजणगाव गणपती ता. शिरूर या ठिकाणी संपन्न झाल्या.
तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळविल्यामुळे पुणे या ठिकाणी होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी खंडाळे शाळेची निवड झाली आहे.
विजयी संघास शिरूर हवेलीचे आमदार अशोकबापू पवार, रांजणगाव गणपती चे सरपंच सर्जेराव खेडकर, गटशिक्षण अधिकारी अनिल बाबर ,विस्तार अधिकारी किसन खोदडे, केंद्रप्रमुख . श्रीहरी पावसे , यांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले.
या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक ज्ञानेश्वर तिरखुंडे, नाथु विर ,राजेंद्र चोरे,सखाराम बनकर,शोभा लोंढे, कमल वीर, नरहरी नरवडे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थी यांनी लेझिम खेळात नेत्रदीपक यश मिळवल्याने विद्यार्थी व शिक्षक यांचे सरपंच ज्योतीताई नरवडे,उपसरपंच अमोल नरवडे, तंटा मुक्ती अध्यक्ष अमोल दरवडे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेश नरवडे तसेच ग्रामस्थ व पालकांनी अभिनंदन केले.