करंजावणे शाळेत आरोग्य शिबिर संपन्न..

0

 

टाकळी हाजी : दि. ( २६ )

शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजावणे येथे जहांगिर हॉस्पिटल व एल जी कंपनीने संयुक्तपणे आरोग्य शिबीर राबविले . यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचे रक्त तपासून त्यांना तात्काळ रक्त गट सांगुन ओळखपत्र देण्यात आले . वातावरणामधील बदल आणि त्या अनुषंगाने घ्यावयाची काळजी याविषयी डॉ . दिपाली क्षिरसागर यांनी मार्गदर्शन केले . शिबीर यशस्विरीत्या पार पाडण्यासाठी संतोष शेवाळे सरांनी पुढाकार घेतला . शिबिर समारोप प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना हॉस्पिटल तर्फे खाऊ वाटप करण्यात आला.

याप्रसंगी डॉ . संध्या गायकवाड, डॉ . प्रभाकर इंगळे, डॉ प्रमोद नवगरे, रविंद्र मते, शिक्षक संतोष शेवाळे, स्मिता कुलकर्णी, संजयकुमार जगताप, वाल्मिक फाळके, स्नेहल घोलप उपस्थित होते .

पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबीर घेण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन शिक्षक नेते संतोष शेवाळे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.