महागणपती क्रेडिट सोसायटीच्या दहाव्या शाखेचे कारेगाव येथे उद्घाटन…
टाकळी हाजी : प्रतिनिधी (दिनांक २५)
कारेगाव तालुका शिरूर येथे महागणपती मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पुणे च्या दहाव्या शाखेचा उद्घाटन समारंभ शिरूर हवेलीचे कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार यांच्या शुभहस्ते आणि भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप दादा वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार( दिनांक २४ ) रोजी संपन्न झाला.
पुणे ते शिरूर या महामार्गाचे नव्याने काम होणार असून यामुळे या भागाचा कायापालट होणार आहे.त्यामुळे संस्थेसाठी भविष्यकाळ उज्वल राहणार आहे. ग्राहक देवो भव: या उक्तीचा धागा पकडून संस्थेचा विकास साधा.असे कार्यक्रमाचे उद्घाटक अशोकबापु पवार यांनी बोलताना सांगितले.
पंचतारांकित औद्योगिक वसाहती जवळ ही संस्था सुरू झाल्यामुळे सर्वसामान्य तसेच नवोदित उद्योजकांना आर्थिक व्यवहारासाठी या सोसायटीचा लाभ होणार आहे. लोकांचा विश्वास संपादन करून ठेवी संकलन आणि योग्य व्यक्तींना निकषानुसार कर्ज वाटप केले जाईल याची काळजी घ्या,आणि यापुढे संस्थेची भरभराट होवून संस्थेचे शतक पूर्ण करून त्याही कार्यक्रमास उपस्थित राहण्याची संधी द्या.असे कार्यक्रमाचे अध्यक्ष भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप दादा वळसे पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी शिरूर हवेली चे करत सम्राट आमदार अशोक बापू पवार, भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप दादा वळसे पाटील, राष्ट्रवादी पक्षाचे शिरूर आंबेगावचे अध्यक्ष मानसिंग भैया पाचुंदकर ,जनता दलाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष नाथा भाऊ शेवाळे, शिरूर पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास आबा कोहोकडे,सुभाष आण्णा उमाप, पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर, कारेगाव चे सरपंच निर्मलाताई नवले ,उद्योजक सचिन भाऊ गवारे,
जोतिबा फुले पतसंस्थेचे अध्यक्ष सोपानराव भाकरे, सोसायटीचे संचालक सुरेश भाकरे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश भाकरे , मुजफ्फर कुरेशी, घोडगंगाचे संचालक नरेंद्र माने, दिलीप लोखंडे, वनविभागाचे तृप्ती गायकवाड, अरविंद फलके, शहाजी गावडे, अरुण भाकरे, अतुल भाकरे, महेश कानडे,विश्वास भुजबळ, राहुल सोदक, प्रशांत बोत्रे, स्वप्निल गावडे, डॉक्टर नारायण घणगावकर , पत्रकार योगेश भाकरे, पोपट पाचंगे , साहेबराव लोखंडे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विकास बेंगडे पाटील, उपाध्यक्ष संजय आप्पा भालेकर, संचालक पवन हगवणे , राजेंद्र हुले,महेंद्र शिंदे आणि बहुसंख्येने मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.
शाखेचे अध्यक्ष विनोद बनकर, उपाध्यक्ष सुरेश वाळके, संचालक एडवोकेट स्वप्निल माळवे, प्रभाकर चव्हाण, सचिन मुथा ,भाऊसाहेब गवारे ,गौतम भाकरे , कैलास बनकर, मनीषाताई नवले, कल्पनाताई हिलाळ यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले. सूत्रसंचालन पोपट इंगवले, निलेश पडवळ तर आभार प्रदर्शन विनोद बनकर यांनी केले.