टाकळी हाजी : प्रतिनिधी
कवठे येमाई (ता.शिरुर) येथिल डाॕ.दत्तात्रय मुलमुले यांची अकोला येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्याक्रमासाठी (M,D, Anasthesia) निवड झाली आहे. पदवीपर्यंतचे एम बी बी एस चे शिक्षण त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापुर येथे पुर्ण केले असून ते सध्या शिरूर तालुक्यातील निमोणे येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत .
त्यांच्या या निवडीबद्दल माजी पं.स.सदस्य डाॕ.सुभाष पोकळे, कवठे येमाई चे सरपंच सुनिता पोकळे , डॉक्टर विलास कांदळकर , निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, टाकळी हाजी चे माजी आदर्श सरपंच दामुशेठ घोडे , सरपंच अरूणाताई घोडे, सोसायटीचे अध्यक्ष बन्सीशेठ घोडे व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.