एकाच वेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तीन परीक्षांमध्ये वैभव पडवळ याचे दैदिप्यमान यश…

पारनेर तालुक्यातील अवलिया... वैभव बाळासाहेब पडवळ

0

 

साहेबराव लोखंडे

टाकळी हाजी : सत्यशोध

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत यश मिळविणारे विद्यार्थी समाजात झळकतातच, पण नगर जिल्ह्यात ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे अशा पारनेर तालुक्यातील लोणी मावळा गावचा वैभव बाळासाहेब पडवळ की जो ‘सहायक गटविकास अधिकारी’ पदाचे प्रशिक्षण घेत आहे या अवलियाने एकाच वेळी ‘पी एस आय’ (PSI), ‘एस टी आय’ (STI), ‘ए एस ओ'(ASO) अशा तीन परीक्षा उत्तीर्ण केल्या असून त्याने संपादन केलेले उज्वल यश संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे आहे. त्याने वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी घेतलेली ही गरुडझेप त्याला उत्तुंग यशाच्या शिखरावर घेऊन जाणारी आहे.

मे २०२२ मध्ये जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेच्या निकालातून पहिल्याच प्रयत्नात वयाच्या २१ व्या वर्षी सहायक गटविकास अधिकारी पदी निवड

मंगळवारी (दिनांक २२) जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेच्या निकालातून PSI शारीरिक चाचणी व मुलाखतीसाठी निवड

बुधवारी( दिनांक२३) जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) च्या निकालातून राज्यात १३ व्या क्रमांकाने STI पदी व राज्यात १७ व्या क्रमांकाने ASO पदी निवड

या अवलिया विषयी थोडक्यात….

वैभव बाळासाहेब पडवळ
लहानपणापासूनच अभ्यासात चमक
इ. ३ री- मंथन प्रज्ञाशोध – जिल्ह्यात १४ वा
इ. ४ थी – शिष्यवृत्ती परीक्षा – जिल्ह्यात १ ला
इ. ५ वी – नवोदय विद्यालय निवड
इ. ६ वी – हेडगेवार प्रज्ञाशोध परीक्षा जिल्ह्यात – १ ला
इ. ७ वी – शिष्यवृत्ती परीक्षा – राज्यात दुसरा ( ग्रामीण भागातून राज्यात पहिला )
इ. ८ वी , ९ वी , १० वी महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत तिनही वर्षी राज्यात पहिल्या १० क्रमांकाने गुणवत्ता यादीत स्थान
१० वी ला NTSE परीक्षा उत्तीर्ण
१० वी त – ९६.८० % गुण मिळवून रयत शिक्षण संस्थेच्या नाशिक ( उत्तर महाराष्ट्र ) विभागातून प्रथम क्रमांक
१२ वी – ८०.६२ % गुण
MH -CET उत्तीर्ण होऊन COEP ( कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे ) इथे नंबर लागला पण इंजिनियरिंगचा प्रवेश नाकारुन YCM ( यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक ) येथे प्रवेश घेऊन ८१.२५% गुणांनी  बी ए ( B.A.) उत्तीर्ण

अभ्यासासोबत खेळातही चमक

राज्यस्तरिय शालेय क्रीडा स्पर्धेत १४ वर्षाखालील वयोगटात खेळताना – १०० मी. धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले असून त्याच स्पर्धेत खेळताना २०० मी. धावण्याच्या शर्यतीत भाग घेऊन रौप्य पदक मिळवून राज्याच्या नकाशावर पारनेरचे नाव झळकावले. तसेच राज्यातील वेगवान धावपटूचा किताब पटकावला.

पारनेर मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेऊन २०१३ साली -३ रा क्रमांक पटकावला.

कूहू स्पोर्ट्स या खाजगी कंपनीने आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धेत भाग घेऊन राज्यात ‘प्रथम’ क्रमांक पटकावला व सदर कंपनीने देशभरातून ऑस्ट्रेलियाला प्रशिक्षणासाठी निवडलेल्या खेळांडूमध्ये निवड

आई – वडील, शिक्षक , भाऊ आणि मित्र परिवार यांचे मोलाचे मार्गदर्शन तसेच जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर वैभवने हे यश मिळवले आहे.

एका प्राथमिक शिक्षकाच्या मुलाने वयाच्या २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नातून BDO , ASO व STI या ३ पदांवर शिक्का मोर्तब तर PSI शारीरिक चाचणी व मुलाखतीसाठी निवड असे नेत्रदिपक यश संपादन करत लोणी मावळा गावचे नाव राज्यात झळकविल्याने परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.