बाळासाहेबांची शिवसेना शिरूर -आंबेगाव युवासेना प्रमुखपदी अमोल पोकळे
टाकळी हाजी : सत्यशोध प्रतिनिधी
शिरूर आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे युवा उपतालुकाप्रमुख म्हणून अमोल पोकळे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. सदर नियुक्तीपत्र शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी दिले, लोकसभा मतदारसंघातील सर्व युवासेना पदाधिकारी युवा सैनिक यांची बैठक नुकतीच आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत लांडेवाडी या ठिकाणी पार पडली .
यावेळी युवा सेनेचे विस्तारक सचिन बांगर, जिल्हा प्रमुख बापूसाहेब शिंदे, युवा सेना जिल्हा चिटणीस वैभव ढोकले उपस्थित होते.या निवडीबद्दल कवठे येमाई परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.