पिंपरखेड येथे स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन
पिंपरखेड : प्रतिनिधी
पिंपरखेड (ता. शिरूर ) येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी शिवसैनिक व ग्रामस्थांकडून अभिवादन करण्यात आले.
पिंपरखेड येथील हनुमान मंदिर येथे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी शिवसैनिकांकडून घोषणा देत त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी जेष्ठ नागरिक विश्वनाथ वरे, लक्ष्मण गायकवाड, सोसायटीचे उपाध्यक्ष नवनाथ पोखरकर, ग्रामपंचायत सदस्य ज्योती बोंबे, उपसरपंच विकास वरे,ग्रामविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरुण ढोमे, अशोक ढोमे, सचिन बोंबे,बाबाजी दाभाडे, सोपान गावशेते, गोविंद जगदाळे, रामदास दरेकर,बळवंत बोंबे, जेष्ठ शिवसैनिक विलास वरे,दत्तात्रय वरे,इस्माईल पठाण, भगवान ढोमे, मच्छिंद्र नरवडे,हनुमंत वरे आदींसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.