भीमाशंकर कारखान्याकडून टाकळी हाजी येथे रस्त्यांची दुरुस्ती सुरू
टाकळी हाजी : प्रतिनिधी
टाकळी हाजी (तालुका शिरूर) येथे ऊस वाहतूकी साठी अडचण होवू नये म्हणून रस्त्यांची दुरुस्ती करणेसाठी ग्रामपंचायत मार्फत सरपंच अरूणा घोडे , उपसरपंच गोविंद गावडे यांच्याकडून भीमाशंकर सहकारी साखर कारखाना पारगाव यांस निवेदन देण्यात आले होते. याची दखल घेत माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील , उपाध्यक्ष प्रदिपदादा वळसे पाटील यांनी या भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी कामास मान्यता देवून सुरुवात केली आहे.
या कामाची सुरुवात आज गुरुवार( दिनांक१७) पासून डोंगरगण येथून करण्यात आली. रस्त्यांची कामे झाल्यास ऊस वाहतूक करण्यात अडचण येणार नाही.शिवाय या भागातील रस्ते ही दुरुस्त होणार असल्याने स्थानिक नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी टाकळी हाजी चे माजी आदर्श सरपंच दामुशेठ घोडे , भीमाशंकर कारखान्याचे अधिकारी पोपट तरटे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.