न्यू इंग्लिश स्कूल, पारनेरचा रेखाकला परीक्षेचा निकाल १०० टक्के

0

पारनेर | महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ अंतर्गत घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, पारनेर या विद्यालयाने १०० टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात शालेय स्तरावर डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या या परीक्षेत विद्यालयातील एकूण १६९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

या परीक्षेत ४७ विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी A ग्रेड, ३७ विद्यार्थ्यांनी B ग्रेड, तर ७९ विद्यार्थ्यांनी C ग्रेड मिळवून यश संपादन केले. विशेष बाब म्हणजे पारनेर तालुक्यातील हा निकाल सर्वाधिक ठरला आहे.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामागे विद्यालयाचे कला विभागप्रमुख कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवडे व कलाशिक्षिका कल्पना नरसाळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढीस लागते तसेच विविध कला कौशल्यांचा विकास होतो. याचबरोबर इयत्ता दहावीच्या अंतिम गुणपत्रकामध्ये A ग्रेडसाठी ७, B ग्रेडसाठी ५ आणि C ग्रेडसाठी ३ वाढीव गुण मिळतात. उच्च कला शिक्षणासाठीही या प्रमाणपत्राचा मोठा उपयोग होतो, असे मत कला विभागप्रमुख यूकेज्ञानेश्वर कवडे यांनी व्यक्त केले.

या यशाबद्दल अ.जि.म.वि.प्र. समाजाचे अध्यक्ष रा. ह. दरे, सचिव मा. ॲड. विश्वासराव आठरे पाटील, जेष्ठ विश्वस्त माजी आमदार नंदकुमार झावरे पाटील, सिताराम खिलारी यांच्यासह संस्थेच्या सर्व विश्वस्त व सदस्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

 विद्यालयाचे प्राचार्य अर्जुन भुजबळ, उपमुख्याध्यापक नानासाहेब काळे, पर्यवेक्षक संतोष इंगळे, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.