न्हावरे येथे क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न..
टाकळी हाजी (दि.१६) : प्रवीण गायकवाड
जिल्हा परिषद,पुणे अंतर्गत घेण्यात येणाऱ्या केंद्रपातळीवरील यशवंतराव चव्हाण कला क्रीडा स्पर्धा शिरूर तालुक्यातील न्हावरे येथे उत्साहात पार पडल्याची माहिती केंद्रप्रमुख दगडू वेताळ यांनी दिली.
स्पर्धेचे उद्घाटन शिरूर तालुका जुनी पेन्शन हक्क संघटनचे तालुकाध्यक्ष व शिरूर शिक्षक पतसंस्था संचालक बबनराव म्हाळसकर यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा न्हावरे येथील क्रीडांगणावर या स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये केंद्रातील सर्व शाळांनी भाग घेतला.
या क्रीडा स्पर्धेत धावणे, उंच उडी, लांब उडी, वक्तृत्व, लोकनृत्य,खो-खो,भजन,लेझीम स्पर्धा पार पडल्या. यावेळी सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.
स्पर्धेचा प्रकार व त्यातील विजयी शाळा पुढीलप्रमाणे :
धावणे– आरुष संदीप पवार ( न्हावरे ),
अक्षदा बापू शेंडगे ( वडखेलवाडी )
उंच उडी – आरुष संदीप पवार ( न्हावरे ),
वैष्णवी गणेश बिडगर ( खंडागळेवस्ती)
लांब उडी – अर्शद परवेझ खान ( न्हावरे ),
अक्षदा बापू शेंडगे ( वडखेलवाडी )
वक्तृत्व – अर्णवी सोमनाथ मारणे
लोकनृत्य – जि.प.शाळा न्हावरे
लेझीम – जि.प.शाळा न्हावरे
भजन – जि.प.शाळा कुटेवस्ती
खो-खो मुले – मुली प्रथम – जि प.शाळा कोहकडेवाडी संघ
सर्व यशस्वी स्पर्धकांना बक्षीस वाटप करण्यात आले.