निमगाव दुडे सोसायटीच्या अध्यक्षपदी संजय गायकवाड

0

शिरूर | निमगाव दुडे (ता. शिरूर) येथील बापूसाहेब गावडे विकास कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी संजय बबन गायकवाड यांची निवड झाली. सोमवारी (दि. १) सहायक निबंधक, सहकारी संस्था शिरूर यांच्या कार्यालयात निवड प्रक्रिया पार पडली. पूर्वीचे अध्यक्ष फक्कड बबन दुडे यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी ही निवडणूक घेण्यात आली.

या निवड प्रक्रियेत संजय बबन गायकवाड आणि ताराबाई म्हतू दुडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. एक संचालक अनुपस्थित राहिल्याने उर्वरित संचालकांनी मतदान करून निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली. संजय गायकवाड यांना सहा तर ताराबाई दुडे यांना पाच मते मिळाली. निवडणूक अधिकारी म्हणून पी. बी. पिसाळ यांनी तर सहायक सचिव अशोक गावडे यांनी निवडणूक कामकाज पाहिले.

सदर निवडणूक माजी सरपंच अश्रिनी गायकवाड आणि उद्योजक रामभाऊ गायकवाड यांच्या कुटुंबीयांच्या प्रतिष्ठेची मानली जात असल्याने ग्रामस्थांमध्ये विशेष उत्सुकता होती.

यावेळी राष्ट्रवादीचे शिरूर-आंबेगावचे सरचिटणीस सुरेश गायकवाड, माजी सरपंच संजय पानगे,माजी उपसरपंच प्रशांत पवार, शहाजी पवार, अविनाश मोरे, मलठण सोसायटीचे अध्यक्ष दत्ता गायकवाड, संतोष घोडे, निमगाव सोसायटीचे उपाध्यक्ष सुरेखा बारहाते, माजी उपाध्यक्ष शांताराम येवले, दिनेश पठारे, संचालक सुमित कांदळकर, ग्रामपंचायत सदस्य अंकुश कांदळकर, पारुबाई येवले, हरिभाऊ पानगे, सप्ताह कमिटीचे रघुनाथ कांदळकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोविंद गाडेकर, आमदाबादचे सामाजिक कार्यकर्ते रेवणनाथ थोरात यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 नवनिर्वाचित अध्यक्ष संजय गायकवाड यांचे माजी आमदार पोपटराव गावडे, पंचायत समिती माजी सदस्य डॉ.सुभाष पोकळे , अरुणा घोडे माजी सरपंच दिपक दुडे , सुरेश पानगे यांनी अभिनंदन केले.सभासद आणि शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्यासाठी व संस्थेच्या हितासाठी प्रयत्नशील राहील, असे गायकवाड यांनी निवडीनंतर सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.