निघोज प्रतिनिधी :
नगर जिल्ह्यातील निघोज (तालुका पारनेर) येथील निघोज – जवळा रोडवर मोटरसायकल – टँकर अपघातात दोन ठार व एक किरकोळ जखमी झाल्याची दुर्घटना मंगळवारी (दि. ८) रोजी सायंकाळी पाच ते साडेपाच च्या दरम्यान घडली.
यामध्ये निलेश गणेश रासकर ( वय वर्षे ३०) आणि कांताराम भिका भांबरे (वय ५३) उपचारापूर्वीच ठार झाले. तसेच संपत नामदेव भांबरे (वय ३०) किरकोळ जखमी झाले.
निघोज मधील मोरवाडी येथील हे रहिवासी आहेत. एकाच वेळी दोन कुटुंबातील प्रमुख गेल्याने मोरवाडी वाडीवर शोककळा पसरली होती. अतिशय दुःखद वातावरणात बुधवारी (दि.९) त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.