शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भाकरे , उपाध्यक्ष पदी प्रशांत भाकरे
माळवाडी जिल्हा परिषद शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीची बिनविरोध निवड
टाकळी हाजी |
माळवाडी (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब मनोहर भाकरे तर उपाध्यक्षपदी प्रशांत संजय भाकरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सदस्यपदी आनंदा भाकरे, प्रकाश भाकरे, निलेश भाकरे, राहुल गारुडकर, कैलास भाकरे, मयूर कानडे, अंकुश भाकरे, पूजा भाकरे, मंगल भाकरे, ज्योती भाकरे, सोनाली रसाळ व शितल गायकवाड यांची निवड झाली. अशी माहिती सचिव तथा मुख्याध्यापक राजेंद्र चोरे यांनी दिली.
यावेळी माळवाडीचे प्रथम सरपंच सोमनाथ भाकरे, माजी अध्यक्ष सुनील भाकरे, योगेश भाकरे, आदिनाथ भाकरे, राहुल भाकरे, तंटामुक्ती अध्यक्ष विलास भाकरे, डॉ. नवनाथ टिळेकर, निलेश भाकरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.