राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान ‘ ( RUSA ) च्या सल्लागार पदी प्रा.डॉ. पांडुरंग बरकले यांची निवड

0

 

पिंपरखेड प्रतिनिधी:( दिनांक ९)

भारतातील उच्च शिक्षणाच्या विकासासाठी भारत सरकारची केंद्र पुरस्कृत योजना ‘ राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान ‘ ( RUSA ) च्या सल्लागार पदी एस.एन.डी.टी.महिला विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक, इंग्रजी विभाग प्रमुख, प्रा.डॉ. पांडुरंग बरकले यांची निवड झाली आहे.    

राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (RUSA), पात्र उच्च शैक्षणिक संस्थांना धोरणात्मक निधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार पुरस्कृत योजना २०१३ मध्ये सुरू करण्यात आली आहे.एस.एन.डी.टी.महिला विद्यापीठात कार्यरत असलेल्या प्रा.डॉ.पांडुरंग बरकले यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन राज्य प्रकल्प संचलनालयाकडून प्रा. डॉ.पांडुरंग बरकले यांची रुसाच्या सल्लागार पदी निवड करण्यात आली असून प्रा.डॉ. पांडुरंग बरकले यांना राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान ( रुसा ) मुंबई कार्यालय येथे सेवा करण्याबाबतचे आदेश राज्य प्रकल्प संचलनालयाने एस.एन.डी.टी महिला विद्यापीठ कुलसचिव यांना दिले आहेत.

चांडोह ( ता.शिरूर ) येथील प्रा.डॉ.पांडुरंग बरकले यांचे बारावी पर्यंतचे शिक्षण श्रीदत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपरखेड येथे झाले आहे.जागतिक इंग्रजी साहित्यावर प्रबंध सादर करत त्यांनी पी.एचडी प्राप्त केली आहे.

प्रा.डॉ. पांडुरंग बरकले यांना प्रशासकीय सेवेत राज्यस्तरावर काम करण्याची संधी मिळाल्या बद्दल माजी विद्यार्थी संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर शेळके,माजी अध्यक्ष डॉ. दादाभाऊ बरकले,सरपंच राजेंद्र दाभाडे, उपसरपंच विकास वरे,तानाजी पोखरकर, पत्रकार आबाजी पोखरकर ,पत्रकार प्रफुल्ल बोंबे यांनी निवडीबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.