मीना शाखा कालव्याच्या शिरोली शाखा अंतर्गत येणाऱ्या वितरीका क्र.२ च्या कामाचा शुभारंभ
पिंपरखेड : प्रतिनिधी (दिनांक ७)
मीना शाखा कालव्याच्या शिरोली शाखा अंतर्गत येणाऱ्या वितरीका क्र.२ च्या कामाचा शुभारंभ कुकडी पाटबंधारे विभागाचे अधिकारी व शेतकरी यांच्या उपस्थितीत करण्यात आला.कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर यांच्या मार्गदर्शनाखाली वितरीका क्र.२ च्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली असून या पाण्यापासून गेले ४० वर्षे वंचित असलेल्या १३४१ हेक्टरवरील पिकांना लाभ होणार असल्याने भविष्यात शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न सुटणार आहे.
पिंपरखेडचे सरपंच राजेंद्र दाभाडे यांनी यासंदर्भात संबंधित विभागाकडे वितरीका क्र.२ च्या वंचित शेतकऱ्यांना पाणी मिळण्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून निवेदन दिले होते.तसेच कालवा सल्लागार समितीचे सदस्य देवदत्त निकम यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाणी मिळण्याची मागणी संबंधित अधिकारी यांच्या कडे केली होती.याची दखल घेऊन कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर, कालवा सल्लागार समितीचे सदस्य देवदत्त निकम, उपविभागीय अधिकारी रविंद्र हांडे,डिंभा धरण विभाग क्र.१ उपविभागीय अधिकारी देवरे, शिरोली शाखाधिकारी सुनील दाते यांनी शेतकऱ्यांसह वितरीका क्र.२ या १२.६३० किमी ची संपूर्ण पहाणी मे महिन्यात केली होती.यापैकी ६.४५० किमी चे काम एक महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे.
पाटबंधारे विभाकडून वितरीकेचे सर्वेक्षण करून कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अभियंता रविंद्र हांडे,धोंडीभाऊ भोर, किसनराव लोखंडे,देवराम ढोमे,गोपाळ पोखरकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कामाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी शाखा अभियंता सुनील दाते, दिपक बोऱ्हाडे,आबाजी पोखरकर,बारकू जगताप, रवीराज गाढवे, गुलाब वाव्हळ,प्रकाश वाव्हळ, शिवाजी लोखंडे, शरद डुकरे,वसंत भोर,सचिन आतकरी अदी उपस्थित होते.