माळवाडीत नागरिकांना अल्पदरात पीठ गिरण्यांचे वाटप
युवा क्रांती संघटनेच्या उपक्रमास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
टाकळी हाजी | (साहेबराव लोखंडे)
माळवाडी (ता. शिरुर, जि. पुणे) येथे मंगळवारी (दि. २८ जुलै) युवा क्रांती पोलीस मित्र संघटना आणि राष्ट्रीय युवती अध्यक्षा जयश्रीताई अहिरे व पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख संदिप भाकरे यांच्या पुढाकाराने ५० नागरिक व महिलांना अल्पदरात पीठ गिरण्यांचे वाटप करण्यात आले. श्री विठ्ठल रखुमाई मंदिर प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय युवती अध्यक्षा जयश्रीताई अहिरे होत्या. तर महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष शिवाजीराव शेलार, राष्ट्रीय सहसंघटक सुरेश अप्पा गायकवाड, राष्ट्रीय किसान विकास मंचचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष , ज्येष्ठ पत्रकार सुभाषअण्णा शेटे, महिला जिल्हा प्रमुख प्रियंका मुरकुटे,, तालुका अध्यक्ष सतीश वाखारे, पुणे जिल्हाध्यक्ष सुदाम रणदिवे , माळवाडीचे सरपंच सोमनाथ भाकरे, , उपसरपंच साधना गारुडकर,, ग्रामसेविका राणीताई रासकर, तसेच विविध मान्यवर, पदाधिकारी आणि महिला ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना जयश्रीताई अहिरे यांनी सांगितले की, “संघटनेच्या माध्यमातून अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचाराविरुद्ध लढा दिला जात आहे. तसेच गरजू महिला व सर्वसामान्य जनतेसाठी आम्ही सदैव कार्यरत आहोत.”
शिवाजीराव शेलार यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि ग्रामीण जनतेच्या कल्याणासाठी राष्ट्रीय किसान विकास मंच स्थापन करण्यात आला असून, ग्रामीण युवकांनी संघटनेत सहभागी व्हावे.”
संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी, नाना महाराज कापडणीस, मधुकर महाराज अहिरे, आनंदराव पगार, अमृतताई पठारे, वर्षा नाईक, वसुधा नाईक, आदींनी या उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबाजी रासकर यांनी केले.
सदर उपक्रमामुळे गावातील महिलांना स्वावलंबी बनण्याचा मार्ग मिळाला असून समाजहिताच्या दिशेने केलेले हे कार्य कौतुकास्पद ठरले आहे.