निघोजमध्ये शेतकरी एकवटणार – उपोषणातून हक्कांची लढाई

निघोजमध्ये शेतकऱ्यांचे भव्य राज्यव्यापी उपोषण आंदोलन सोमवारपासून सुरू

0

निघोज | प्रतिनिधी

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवार, दिनांक २८ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजल्यापासून निघोज (ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) येथील बस स्थानक परिसरात भव्य राज्यव्यापी उपोषणाला सुरुवात होणार आहे.

या उपोषणात राज्यभरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, “जय जवान जय किसान” आणि “आपली माती, आपली माणसं” हा नारा देत शेतकऱ्यांचे नेतृत्व करणारे रुपेश मारुती ढवण, महेंद्र पांढरकर आणि इतर शेतकरी कार्यकर्ते आपल्या न्यायहक्कासाठी लढा देणार आहेत.

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या :

१. कांद्याला किमान ₹३५ ते ₹४० प्रति किलो दर मिळावा.
२. सरकारने निवडणुकीच्या वेळी जाहीर केलेली कर्जमाफी तातडीने अंमलात आणावी.
३. शेतमालासाठी निर्यात धोरण त्वरित लागू करावे.
४. नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
५. दुधासह सर्व शेतीमालाला हमीभाव मिळावा.

शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली असून, हे उपोषण शांततामय पद्धतीने होणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

उपोषण स्थळ: निघोज बसस्थानक परिसर, ता.पारनेर, जि.अहिल्यानगर – ४१४३०६

राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना या लढ्याला पाठींबा देण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले असून “संघटित होऊनच आपले हक्क मिळवू शकतो” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.