टाकळी हाजी |( साहेबराव लोखंडे )
शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील मंडल अधिकारी यांच्या कार्यप्रणालीवर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. सातत्याने तक्रारी, चौकशीची मागणी आणि जनतेचा रोष असूनही संबंधित अधिकाऱ्यावर कोणतीही ठोस कारवाई न होणे, हे संशयास कारण ठरत आहे.
विशेष म्हणजे, संबंधित अधिकाऱ्याला तालुक्याचे तहसीलदार सातत्याने पाठीशी घालत असल्याचे निदर्शनास येत आहे. या संरक्षणामागे केवळ प्रशासनिक कारणे आहेत की यामध्ये काही व्यक्तिगत हितसंबंध गुंतले आहेत, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून या अधिकाऱ्याविरोधात विविध प्रकारच्या तक्रारी होत असूनही चौकशीची गती मंदच आहे. त्यामुळे ‘तहसीलदार यांना या अधिकाऱ्याच्या उपस्थितीत नेमका काय फायदा होतो आहे का?’ हा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून पारदर्शक चौकशी करावी व जनतेच्या मनातील संशय दूर करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. अन्यथा प्रशासनाविषयीचा विश्वास उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
क्रमशः