डाळींब चोरी प्रकरणात शिरूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

  चोरट्याच्या मुसक्या आवळल्या

0

शिरूर | प्रतिनिधी

मोटेवाडी (ता. शिरूर) येथे शेतातून झालेल्या सुमारे एक लाख चाळीस हजार रुपये किंमतीच्या डाळींब चोरीप्रकरणी शिरूर पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत तपास उलगडत मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

शेतकरी संदीप येलभर यांच्या शेतातून चोरट्यांनी डाळींब चोरून नेल्याची घटना ७ जुलैच्या रात्री घडली होती.या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व त्यांच्या पथकाने कसून तपास केला असता तपासादरम्यान चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी ही आकाश बशीर काळे (वय २५, रा. सोनेसांगवी, ता. शिरूर) याच्याच मालकीची असल्याचे निष्पन्न झाले. गोपनीय माहितीच्या आधारे रांजणगाव परिसरात सापळा रचत आरोपीला अटक करण्यात आली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदिप गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, तसेच पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, विनोद मोरे, पोलीस अंमलदार विजय शिंदे, नितेश थोरात, निरज पिसाळ, सचिन भोई, निखील रावडे, रविंद्र आव्हाड, अजय पाटील यांच्या पथकाने केली.

शेतकऱ्यांच्या मालमत्तेच्या सुरक्षेच्या दृष्टीने शिरूर पोलिसांचे हे तत्पर आणि कौतुकास्पद पाऊल असल्याचे ग्रामीण भागातून बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.