टाकळी हाजी येथे गावठी दारू ची हातभट्टी उध्वस्त
टाकळी हाजी प्रतिनिधी
टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील तामखरवाडी येथे पोलिसांनी गावठी दारू ची हातभट्टी उध्वस्त केली . अंदाजे ३० हजार रुपये किमतीचे सहाशे लिटर कच्चे रसायन व एक हजार पाचशे रुपये किमतीची केमिकल युक्त ताडी जप्त करण्यात आली आहे.
तामखरवाडी येथे आपण एखादयाचे दुखापतीला कारणीभुत होवु शकतो हे माहीत असतांना, मानवी आरोग्यास अपायकारक व हानीकारक असलेली ३० लिटर केमीकलयुक्त ताडी, तसेच ६०० लिटर गावठी हात भट्टी तयार करण्याचे कच्चे रसायन असे एकुण अंदाजे ३१ हजार ५०० रुपये किमतीचा माल मिळुन आला, चाहुल लागताच भट्टी चालक पळुन गेला होता . अशी माहिती पोलिसांकडून मिळाली.
ही कारवाई पोलीस कॉन्स्टेबल विशाल पालवे यांनी केली असून भट्टी चालका विरुद्ध फिर्याद दाखल झाली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले करत आहेत.