शिरूर शहरातील सराईत गुंडास पोलिसांनी केले स्थानबद्ध

शिरूर पोलीस स्टेशनची कारवाई

0

टाकळी हाजी |

शिरूर पोलिस स्टेशन रेकॉर्डवरील सराईत गुंड गुन्हेगार आशुतोष मिलींद काळे (वय २६, रा. सय्यदबाबानगर, शिरूर) याला शिरूर येथून ताब्यात घेतले असून, अमरावती जिल्हा कारागृह अमरावती येथे जमा करून स्थानबध्द केले आहे.

शिरूर पोलिस स्टेशन रेकॉर्डवरील सराईत गुंड गुन्हेगार आशुतोष मिलींद काळे (वय २६, रा. सय्यदबाबानगर, शिरूर) याच्यावर शिरूर पोलिस ठाणे येथे खून करण्याचा प्रयत्न करणे, इच्छापुर्वक गंभीर, साधी दुखापत करून नशापाणी करून हाताने मारहाण करून शिवीगाळ करणे, सार्वजनिक ठिकाणी हाताने मारहाण करून शिवीगाळ दमदाटी करीत घातक हत्याराचे साहयाने दहशत करीत मालमत्तेचे नुकसान करणे, मालमत्तेचे जाळून नुकसान करणे, खुन करण्याचा प्रयत्न करणे, बेकायदा जमाव जमवुन बेकायदेशिर अग्नीशस्त्राचा व प्राणघातक हत्यारांचा वापर करून खुन करण्याचा प्रयत्न करणे, बेकायदेशिर अग्नीशस्त्र नेहमी जवळ बाळगणे अशा गंभीर स्वरूपाचे शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्दचे एकूण ७ गंभीर गुन्हे आहेत. सन २०१९ ते २०२४ या कालावधीत गुन्हे दाखल असून आशुतोष मिलींद काळे याला कायदयाचे कुठलेही भय कायदयाचा वचक त्याच्यावर राहिला नव्हता. त्यामुळे त्याच्यावर सन २०२३ मध्ये शिरूर पोलिस ठाणे मार्फत मुंबई पोलिस कायदा कलम ५५ प्रमाणे प्रतिबंधक प्रस्ताव पोलिस अधिक्षक पुणे ग्रामीण यांच्या कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता. तत्कालीन वेळी पोलिस अधिक्षक पुणे ग्रामीण यांनी त्यास १ वर्षाकरीता पुणे जिल्हा व अहमदनगर जिल्हयातील पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातुन तडीपार केले होते.

आरोपीने तडीपार कालावधीतही आपले गुन्हेगारी वर्तन/कारवाया चालू ठेवल्याने विधानसभा निवडणुक सन २०२४ ची आदर्श आचारसंहीता जारी असल्याने पुणे ग्रामीण जिल्हयातील व शिरूर पोलिस ठाणे हददीतील कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्याकरीता पोलिस अधिक्षक पुणे ग्रामीण यांच्या सुचनेप्रमाणे त्यास महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार व दृकश्राव्य कलाकृतीचे विना परवाना प्रदर्शन करणारे व्यक्ती (व्हिडीओ पायरेटस), वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणा-या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे बाबत अधिनियम सन १९८१ सूधारणा अधिनियम २०१५ चे कलम ३ (१) अन्वये “धोकादायक व्यक्ती “या सदराखाली स्थानबदधतेची कारवाई होण्याकामी पोलिस निरीक्षक संदेश केंजळे, शिरूर पोलिस ठाणे यांना उपरोक्त एम.पी.डी.ए. कायदयाप्रमाणे प्रस्ताव सादर करण्यास सांगीतला होता. त्याप्रमाणे पोलिस निरीक्षक यांनी प्रस्ताव पोलिस अधिक्षक पुणे ग्रामीण यांच्या कार्यालयात सादर केला होता. पोलिस अधिक्षक कार्यालयाकडुन सदर प्रस्ताव जिल्हाधिकारी पुणे यांचेकडे दाखल करण्यात आला होता. त्या अनुशंगाने जिल्हाधिकारी पुणे यांनी आशुतोष मिलींद काळे यास स्थानबध्दकरणेबाबत १९ नोव्हेंबर रोजी आदेश दिल्याने स्थानबध्द आशुतोष काळे याचा शिरूर पोलिसांनी शोध घेवून २० नोव्हेंबर रोजी रात्री ७.३०वा. सुमारास त्यास सय्यदबाबानगर शिरूर येथून ताब्यात घेतले. त्यास दि. २१ नोव्हेंबर रोजी अमरावती जिल्हा कारागृह अमरावती येथे जमा करून स्थानबध्द केले आहे.

 आशुतोष काळे याच्यावर ठोस प्रतिबंधक कार्यवाही करून त्याला स्थानबध्द करण्याकामी अप्पर पोलिस अधिक्षक पुणे विभाग रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, पोलिस निरीक्षक शिरूर संदेश केंजळे, पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा पुणे ग्रामीणचे अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक हणमंतराव गीरी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस हवालदार महेश बनकर, पोलिस हवालदार रामदास बाबर, शिरूर पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार परशराम सांगळे व पोलिस अमंलदार सचिन भोई यांनी कामकाज पाहिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.