टाकळी हाजी येथे अरुणाताई आणि दामुआण्णा घोडे यांच्या हस्ते काकडा आरती
टाकळी हाजी येथे अरुणाताई आणि दामुआण्णा घोडे यांच्या हस्ते काकडा आरती
टाकळी हाजी |
टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील विठ्ठल रुख्मिणी मंदिरात सुरू असलेल्या काकडा समारंभातील शुक्रवार दिनांक 15 नोव्हेंबर रोजीची काकडा आरती आदर्श सरपंच सौ.अरुणाताई आणि दामुआण्णा घोडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाली.
काकड आरती म्हणजे हिंदू धर्मात देवाला उठवण्यासाठी पहाटेच्या वेळी केलेली आरती होय. या वेळी देवाच्या मूर्तींला काकडयाने (ज्योत) ओवाळले जाते, मंदिरांमध्ये पहाटे काकड आरती केली जाते. या आरतीसाठी ज्ञानेश्र्वर भजनी मंडळ, काकडा उत्सव मंडळ, भाविक भक्त आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.